तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

नार्सिसिझम

तुमच्या पैकी अनेकांना हा शब्द किंवा त्याचा अर्थ माहिती नसेल. Narcissistic Personality Disorder हा जगातल्या १० प्रमुख मानसिक आजारांपैकी एक आहे. पण एखाद्या माणसात नार्सिसिस्टिक स्वभाव विशेष आहेत म्हणजे त्याला या प्रकारची disorder आहे असं आपण म्हणू शकत नाही. अनेक माणसांमध्ये थोड्या फार प्रमाणात हे गुण असू शकतात पण त्या गुणांमुळे जेंव्हा दुसऱ्या व्यक्तीला त्रास होतो तेंव्हा ते “अवगुण” होतात आणि त्यांच्या पासून त्या दुसऱ्या व्यक्तीला वाचवण गरजेचं होऊन जातं.

तुम्ही या पर्सनॅलिटीचे स्वभावविशेष समजून घेतले  तर तुम्हाला जाणवेल कि हा स्वभाव आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कितीतरी व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात असतो. आणि जर तुम्ही अशा स्वभावाच्या व्यक्ती बरोबर रहात असाल तर तुम्ही कदाचित मानसिक अत्याचाराचे बळी असू शकता.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा स्वभावदोष कुठल्याही व्यक्तीमध्ये असू शकतो. ती व्यक्ती आई, वडील ,सख्खे भाऊ , बहीण ,मित्र , कुटुंबातले इतर सदस्य किंवा अगदी कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस सुद्धा असू शकते. मी या ब्लॉग मध्ये वर्णन केलेल्या गोष्टी यापैकी कुठल्याही व्यक्तीला लागू पडू शकतात. मात्र माझा या प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा अनुभव माझ्या लग्नानंतरचा असल्यामुळे मी जी माहिती लिहिली आहे ती माझ्या त्या नात्याच्या अनुभवातून लिहिली आहे.

जगात असंख्य लोकं आहेत जी दुसऱ्याच्या या स्वभावामुळे स्वतः त्रासात आहेत. तर या स्वभाववैशिष्ट्याबद्दल आणि त्या पासून स्वतःचा बचाव कसा करावा या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीच माझा हा ब्लॉग आहे. माझ्या बद्दल थोडंसं

अत्याचार करणाऱ्या इतकाच तो सहन करणारा अत्याचारासाठी जबाबदार असतो.

Subscribe

तुम्हाला माझा ब्लॉग आणि त्या वरची पोस्ट्स आवडत असतील तर प्लिज माझ्या ब्लॉग ला सबस्क्राइब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा.