नार्सिसिस्ट म्हणजे काय हे जाणून घेण्या आधी आपण Emotional Abuse म्हणजे काय ते समजून घेऊ. खरं तर abuse हा शब्द ऐकला कि आपल्याला आठवतं ते एका व्यसनाधीन व्यक्तीचं त्याच्या बायको ला मुलांना कारण नसताना मारणं , त्यांचा छळ करणं किंवा सासरच्या माणसाकडून सुनेचा झालेला छळ. पण जेंव्हा कोणत्याही प्रकारे शारीरिक मारहाण किंवा उघडपणे दिसेल असे गैरवर्तन न करता केवळ आपल्या कृतीतून किंवा बोलण्यातून जेंव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती च्या बाबतीत गैरवर्तन करते तेंव्हा होतो Emotional Abuse म्हणजेच मानसिक अत्याचार !
आपल्याकडे आणि खरं तर जगात सगळीकडेच मानसीक अत्याचार बद्दल खूप कमी बोललं आणि लिहिलं जातं. त्यामुळे बहुतांशी असा अत्याचार सहन करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्यांच्या बाबतीत काही चुकीचं घडतंय हे समजतच नाही. अशा प्रकारचं गैरवर्तन हे नेहमी चार भिंतींच्या आत होत असल्यामुळे बाहेर च्या जगाला आत असं काही होत असेल याची कल्पना पण नसते आणि व्हिक्टिम्सना असं वाटत रहातं कि सगळ्यांच्या घरी तसच असतं त्यामुळे ते सहन करत राहतात.
नार्सिसिझम हा Emotional Abuse चा एक प्रकार आहे. गेल्या ७-८ वर्षात जगभरात या बद्दल खूप बोललं आणि लिहिलं जाऊ लागलंय पण तेही काही मर्यादित लोकांपर्यंत पोहोचतंय. माझंच उदाहरण घ्या ना .. जी माहिती मला गेल्या वर्षभरात कळली ती खरं तर YouTube , Google ,Spotify ,Apple podcast , Audible या सगळ्यांवर अनेक वर्षांपासून आहे. मी हि सगळी apps अगदी नियमित वापरत पण आहे. पण मी स्वतः या विषयापासून पूर्णपणे अनभिज्ञ होते. असो.
तर नार्सिसिस्ट म्हणजे “आत्मपूजक” व्यक्ती. जी व्यक्ती स्वतःच्याच अवाजवी प्रेमात असते. खरं तर स्वाभिमान कधीही चांगलाच असतो पण जो पर्यंत तो फक्त स्वतःच्या चांगल्या साठी आणि इतरांना न दुखावता ठराविक मर्यादेपर्यंत असतो तो पर्यंतच तो चांगला असतो.
(लॆखानाच्या सोयीसाठी या पुढे नार्सिसिस्टिक व्यक्तीचा मी NC असा उल्लेख करणार आहे.)
तर या NC व्यक्तींनी स्वतःभोवती एक मोठेपणाच , स्वतःच्या कौतुकाचं भ्रमिक वर्तुळ तयार केलेलं असतं त्यांची प्रत्येक कृती, बोलणं , वागणं हे सगळं मग त्या मोठेपणाच्या वर्तुळाला सुरक्षित ठेवण्यासाठीच असतं.
NC च्या सतत संपर्कात येणाऱ्या किंवा त्यांच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तींनी सतत त्यांचं कौतुक केलं , त्यांच्या मनाप्रमाणे वागलं की ते वर्तुळ सुरक्षित आहे असा त्यांचा समज असतो. मग सगळ्यांकडून ते validation ( ज्याला Narcissistic Supply म्हणतात) ते मिळत रहावं म्हणून आपल्या आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणाखाली असावी असा NC व्यक्तीचा प्रयत्न असतो.
त्यांच्या जवळच्या नात्यात किंवा त्यांच्या सोबत राहणाऱ्या लोकांना मग त्या कंट्रोलिंग वागण्याचा त्रास सुरु होतो. त्यांनी जर प्रतिकार केलाच तर मग NC तो कंट्रोल परत मिळविण्यासाठी पुन्हा आपले वेगवेगळे उपाय सुरु करतो जस कि “Love-Bombing”, “Hoovering”, “Gaslighting” वगैरे वगैरे. या सगळ्या प्रकारांची आपण येणाऱ्या पोस्ट मध्ये माहिती करू घेऊच. पण त्या आधी Narcissistic Personality बद्दल काही ..
American Psychiatric Association ने त्यांच्या Diagnostic and Statistical Manual (DSM-5) मध्ये Narcissistic Personality Disorder असणाऱ्या व्यक्तीची ९ प्रमुख लक्षणे सांगितली आहेत. खाली मी माझ्या परीने त्यांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही व्यक्तीमध्ये यातील ५ किंवा अधिक लक्षणे असतील तर त्या व्यक्तीचं निदान Narcissistic Personality Disorder या विकारासाठी होऊ शकतं आणि तुम्ही जर त्या व्यक्तीच्या जवळच्या संबंधितापैकी एक असाल तर या स्वभावाचे वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतात.
- स्वतःबद्दल अवाजवी मोठेपणाची भावना असणे आणि सदैव कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती दाखवत रहाणे.
- सतत स्वतःच्या यशांच्या, बुद्धीच्या, मोठ्या कामगिरीच्या बाबतीत वायफळ कल्पनाविलास करणे.
- स्वतः जगात आपल्यापेक्षा वरचढ कुणी नाहीच असा भ्रम बाळगणे.
- आपल्या आजूबाजूच्या लोकांनी सतत आपलं कौतुकच करत राहीलं पाहीजे अशी त्यांच्याकडून अपेक्षा करणे
- आपण खूप खास असल्यामुळे आजूबाजूच्या सगळ्यांनी आपली सेवा केली पाहीजे आणि आपल्या मतांशी सहमती दाखवलीपाहिजे अशी अपेक्षा करणे.
- आपल्या संपर्कात येणाऱ्या इतर कुठल्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या यशाचा व कामगिरीचा उपहास करणे.
- इतर कोणत्याही सजीव व्यक्ती किंवा प्राण्याबद्दल मनापासून दया, प्रेम किंवा सहानुभूती नसणे.
- सतत इतरांचा दुःस्वास करणे किंवा दुसरे आपला कायम दुस्वास करतात अशी भावना बाळगणे.
- स्वतः बद्दल पोकळ अहंकार बाळगणे आणि लोकांसमोर सतत स्वतःच्या बाबतीत मोठेपणाच्या गोष्टी करणे.
मी काही कोणी counselor किंवा psychiatric professional नाही. माझ्या ऐकण्यात , वाचण्यात ज्या गोष्टी आल्या आणि ज्या मला पटल्या त्या तुमच्याशी शेअर करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
तेंव्हा तुम्ही खरंच जर मानसिक तणावातून जात असाल तर एखाद्या licensed medical professional ची मदत नक्की घ्या.
जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर Please माझ्या Instagram handle ला follow karaआणि या ब्लॉग ला subscribe करा. तुमचा सपोर्ट असेल तर पुढे लिहीत राहायला मला प्रोत्साहन मिळेल.
