नार्सिसिस्टीक व्यक्तींचे प्रकार

नार्सिसिस्टीक व्यक्तींचे प्रामुख्याने ५ प्रकार आहेत.  Overt , Covert , Communal , Antagonistic and Malignant Narcissist

या सगळ्या प्रकारांमध्ये सारखी असणारी गोष्ट म्हणजे नार्सिसिस्टीक व्यक्तीचा  आपल्या आजुबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ,व्यक्तीवर आणि परिस्थितीवर सतत ताबा ठेवण्याचा ध्यास.

यातले सगळ्यात कॉमन दोन प्रकार म्हणजे Overt (Grandiose) Narcissist आणि Covert Narcissist.

Overt or Grandiose Narcissist

या प्रकारची व्याख्या अशी आहे . A Person with Unrealistic Sense of Superiority. म्हणजेच या लोकांना स्वतःच्या मोठेपणाचा अवाजवी अभिमान किंवा गर्व असतो. आपण म्हणतो ना “ग ची बाधा होणे” त्यामुळे हे लोक सतत इतरांच्या मधले प्रॉब्लेम बघत असतात. रादर त्यांना इतरांच्या मधल्या वाईट गोष्टीच दिसतात आणि ते नेहमी त्याच बोलून दाखवतात. 

इतर सगळ्यांमधल्या चुका काढून त्यांना स्वतःचा खोटा मोठेपणा सिद्ध झाल्यासारखा वाटतो. 

खरं तर आतल्या आत अशी लोकं खूप insecure असतात. पण त्यांची ती insecurity कुणाला कळू नये म्हणून सतत आपल्या आजुबाजुंच्या व्यक्तींना टोमणे मारणे, त्यांच्या चुका दाखवून देणे, मस्करी करणे अशा प्रकारचे manipulation करत राहतात. ते सहसा खूप उद्धट आणि माझ्या सारखा मीच अशा अविर्भावात सतत फिरत असतात. पार्टीमध्ये काही ना काही कारणाने त्यांना “center of attention”व्हायचं असतं त्यामुळे ज्या विषयामध्ये बोलल्याने लोकं त्यांचं कौतुक करतील किंवा त्यांना मोठेपणा मिळेल असे विषय ते सुरु करतात. आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी सगळ्यांना मोठेपणाने सांगणे हाच त्यांचा हेतू असतो. पण पार्टी मध्ये जर इतर कुणाला कौतुक मिळत असेल तर ते मात्र त्यांना बोचतं आणि मग ते कसाही करून तो विषय स्वतःकडे वळवतात. 

अशा व्यक्ती इतकं बोलतात कि त्यांचा तो स्वभाव लगेचच दिसून येतो. 

Covert or Vulnerable Narcissist

हा Narcissist लोकांचा सगळ्यात धोकादायक प्रकार आहे. हे लोक पहिल्या प्रकारासारखे लोकांसमोर मोठमोठ्या बाता मारत नाहीत उलट ते काही न बोलता शांतपणे आपला मोठेपणा दाखवत राहतात. म्हणजे पार्टी मध्ये ते एका बाजूच्या कोपऱ्यात बसून लोकांना नावं ठेवतील किंवा पार्टीनंतर लोकांना फोन करून पार्टी मध्ये बोलल्या गेलेल्या गोष्टी बद्दल स्वतःचा मोठेपणा सांगतील. लोकांना मदतही करतील पण ती मदत तोपर्यंतच जो पर्यंत त्यांच्या खोट्या अहंकारचं कौतुक होतंय. ज्या क्षणी ते कौतुक बंद होतं त्या क्षणी ती व्यक्ती Covert Narcissist साठी वाईट बनते. मग त्या व्यक्तीला सायलेंट ट्रीटमेंट देणं , कुठल्यातरी संबंध नसणाऱ्या बाबतीत राग काढणं असे प्रकार सुरु होतात. 

त्यांच्या इन्ट्रोव्हर्ट स्वभावमुळे बाहेरच्या लोकांना ते फार शांत आणि समंजस वाटतात. Covert NC लोकं आपण किती बिचारे आणि गरीब आहोत याचा तमाशा करण्यात फारच तरबेज असतात. त्यामुळे त्यांचं  सगळं विचित्र वागणं फक्त जवळच्या , त्यांच्या कायम संपर्कात असणाऱ्या माणसांसमोर असतं. NC व्यक्तीच्या अशा दुट्टपी वागण्यामुळे त्यांचे व्हिक्टिम सतत गोंधळले राहतात आणि त्यांचं विचित्र वागणं सहन करत राहतात. 

मी काही कोणी licensed psychologist किंवा  psychotherapist नाही पण मी एका Overt + Covert Narcissistic personality च्या व्यक्ती बरोबर १८ वर्ष संसार केला आणि या सगळ्या गोष्टी सहन केल्या आहेत. त्यामुळे मी confidently हे सगळं बरोबर आहे हे सांगू शकते. 

Narcissistic व्यक्ती बरोबर रहाणं हे अतिशय गोंधळून टाकणारं असतं आपण स्वतःच त्यांच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करत राहतो आणि त्यात स्वतःच खोल अडकत जातो. त्यामुळे जर तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या जवळच्या कुणाच्या तरी बाबतीत हे घडत असेल तर प्लिज एखाद्या licensed professional शी बोला. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. 

जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर Please माझ्या Instagram handle ला follow karaआणि या ब्लॉग ला  subscribe करा. तुमचा सपोर्ट असेल तर पुढे लिहीत राहायला मला प्रोत्साहन मिळेल. 

Leave a comment