नार्सीसिस्टिक नात्यात अडकलेले लोक हे नेहमीच एका दुष्टचक्रात अडकलेले असतात. या चक्राला Narcissistic Abuse Cycle असं म्हणतात. नातं सुरु झाल्यापासून किंबहुना ते नातं सुरु होण्याआधीच या चक्रव्यूहाची सुरुवात झालेली असते.
Very well mind या संकेतस्थळा नुसार या दुष्टचक्राची व्याख्या अशी आहे.
The narcissistic abuse cycle refers to an abusive pattern of behavior that characterizes the relationships of people with narcissistic traits. It involves first idealizing a person, then devaluing them, repeating the cycle, and eventually discarding them when they are of no further use.
हे दुष्टचक्र म्हणजे मानसिक छळ करण्याची पुन्हा पुन्हा घडणारी एक कृती आहे. वास्तविकपणे,हि एका नार्सिसिस्टची आपल्या सावजाला नात्यात अडकवून ठेवायची पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वागवायच्या ४ स्टेजेस आहेत. जे नातं सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत सतत चालूच असतात.
१. Idealization Stage (अतीव प्रेम किंवा काळजी)
हि स्टेज सगळ्यात धोकादायक आणि व्हिक्टिम्सना गोंधळून जाण्याचं मुख्य कारण इथेच असतं. या स्टेज मध्ये नार्सिसिस्ट आपल्या व्हिक्टीमस चे खुप लाड करतात, त्यांच्या मनाप्रमाणे वागतात ,त्यांना गिफ्ट आणतात ,खूप काळजी घेतात , प्रेमाने वागतात. जर तुम्ही एखाद्या नार्सिसिस्ट बरोबर प्रेमाच्या नात्यात असाल तर जणू काही ते तुमच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत असच या स्टेज मध्ये तुम्हाला वाटत राहील
तुमचा मित्र जर नार्सिसिस्ट असेल तर तो सतत तुम्हाला फोन करत राहील, तुम्हाच्या बरोबर वेळ घालयवायचा प्रयत्न करेल आणि तुम्ही किती स्पेशल आहात ते सांगत राहील.. या स्टेज मध्ये व्हिक्टिम्स इतके हुरळून जातात कि आपण एका बेस्ट नात्यात आहोत असच त्यांना वाटू लागतं
२. Devaluation Stage ( मानसिक छळाला सुरुवात)
खूप दिवस कौतुक आणि व्हिक्टिमकडे अति लक्ष दिल्यामुळे आता नार्सिसिस्ट कंटाळू लागतो आणि मग पुन्हा मस्करी च्या नावाखाली टोमणे मारणे, बाहेरच्या लोकांसमोर गमंत करतोय असं म्हणून व्हिक्टिम्स च्या काही चुका सतत बोलून दाखवणे , सगळ्या चुकीच्या गोष्टींना व्हिक्टिम्सना जबाबदार ठरवणे आणि स्वतः कोणतीही जबाबदारी न घेणे अशा gaslighting techniques सुरु होतात. यामुळे काही दिवसांपूर्वी आपल्यावर एवढा प्रेम दाखवणारा व्यक्ती असा अचानक इतका विचित्र का वागतोय अशा संभ्रमात व्हिक्टिम्स पडतात.
३. Repetition Stage ( क्षणात प्रेम तर क्षणात नाराजी )
नार्सिसिस्टिक व्यक्ती सरड्यासारखे रंग बदलतात ते आपल्याला माहीतच आहे पण या तिसऱ्या स्टेज मध्ये नार्सिसिस्ट आणखीच विचित्र वागू लागतात. त्यांचा passive – aggressive पण विकोपाला जातो. म्हणजे एका क्षणी ते खूप आनंदी , उत्साही असतात तर दुसऱ्याच क्षणी मुलं घरात किती दंगा करतात आणि गोंगाट करतात म्हणून त्यांच्या वर खेकसतात. या विचित्र वागण्यामुळे मग आजूबाजूचे सगळेच गोंधळून जातात आपण काय केलं तर हि नार्सिसिस्टिक व्यक्ती चिडेल याचा नेम नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट घाबरत आणि अति काळजीपूर्वक करत राहतात. याला म्हणतात Walking On Eggshells.
म्हणजे नार्सिसिस्ट अगदी उघड उघड पणे छळ करत नसला तरीही त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कधीच मोकळेपणाने वागता येत नाही. उगीच छोट्या छोट्या कारणाने घरात चीड चीड नको म्हणून मग बाकीचे लोकच सतत घाबरून वागू लागतात.
४. Discard Stage ( संभ्रमित करणे)
या शेवटच्या स्टेजमध्ये वरच्या नंबर २ आणि ३ स्टेजेस चे सगळे प्रकार होतच राहतात. एक क्षण असा येतो कि मग व्हिक्टिम्स सतत च्या अशा वागणुकीमुळे कंटाळून जातात. आपलं नातं कसं संपवता येईल असा विचार त्यांच्या मनात येऊ लागतो. नार्सिसिस्ट व्यक्तीशी ते बोलणं बंद करतात. त्यांच्या पासून तुटक किंवा जेवढ्यास तेवढं वागू लागतात. थोड्याफार प्रमाणात gray rocking सारख्या वागण्याला सुरुवात होते.
या वेळी नार्सिसिस्टला त्याचा सप्लाय मिळणं बंद होतं त्यामुळे ते एकतर सध्याच्या सप्लाय ला सोडून देतात आणि कोणीतरी दुसरा सप्लाय शोधतात .
दुसरा सप्लाय मिळणं शक्य नसेल तर आपलं सावज आपल्या कचाट्यातून सुटू पाहताय याची जाणीव नार्सिसिस्ट ला होते. आपल्या सावजावर पकड मजबूत करण्याची गरज त्यांना वाटू लागते
त्यावेळी ते पुन्हा आपला प्रेमळ मुखवटा घालतात आणि चक्र पुन्हा सुरू होतं. या ४ स्टेज काही नेहमी अशाच ठरविक क्रमाने होतात असंही नाही. कधी १,२,३ स्टेज पुन्हा पुन्हा होत राहतात आणि जेंव्हा अगदीच टोक गाठलं जातं तेव्हा चौथी स्टेज होते. किंवा कधी कधी २-३ स्टेज सतत चालूच राहतात.
असं असतं तर मग व्हिक्टिम्स त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न का करत नाहीत?
याचं कारण म्हणजे व्हिक्टिम्स च्या मनातली भीती आणि संभ्रम.
भीती या गोष्टीची कि जर आपण नार्सिसिस्ट व्यक्तीच्या मनाविरुद्ध वागलो किंवा प्रतिकार केला तर आपल्याला अधिकच त्याच्या रागाला आणि द्वेषाला सामोरं जावं लागेल. किंवा आपल्या मुले घरातल्या इतर माणसांना पण नार्सिसिस्ट व्यक्तीच्या चिडचिडीला आणि रागाला सहन करावं लागेल.
संभ्रम हा कि जो माणूस एका वेळी माझ्याशी इतका प्रेमाने वागत होता तो आता माझ्याशी वाईट वागतोय. म्हणजे त्याच्या मनात प्रेम आहे फक्त त्याला राग आला कि तो विचित्र वागतो. त्यामुळे आपण प्प्रतिकार करण्याची काही गरज नाही आहे.
कधी कधी व्हिक्टिम्स ना त्या तश्या जगण्याची इतकी सवय होऊन जाते कि ते प्रतिकार करण्याऐवजी दुर्लक्ष करू लागतात आणि इतर गोष्टींमध्ये स्वतःला अतिशय बिझी करून घेतात. पण त्यामुळे नार्सिसिस्टचं मात्र फावतं आणि ते आपलं वागणं कधीच बदलत नाहीत.
या चक्रव्यूहाला तोडता येऊ शकतं का ?
अगदीच या चक्रव्यूहाला तोडणं अगदीच शक्य आहे जर व्हिक्टीमने मनापासून तसं ठरवलं तर !
त्या साठी व्हिक्टीमनी होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता परिस्थितीला स्वीकारणं महत्त्वाचं आहे.एकदा परिस्थिती स्वीकारली कि मग आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना हळू हळू सापडत जातो.
मानसिक अत्याचारातुन स्वतःला कसं सावरायचं या भागात मी त्या बद्दल सविस्तर लिहीनच.
तुम्हाला हि माहिती उपयोगी वाटते का? वाटत असेल तर प्लिज माझ्या ब्लॉग ला सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा . तुमच्या काही प्रतिक्रया असतील तर मला इमेल करून नक्की सांगा.
Work Cited
Daramus, Aimee, and Sanjana Gupta. “Narcissistic Abuse Cycle: Stages, Impact, and Coping.” Verywell Mind, 15 August 2022, https://www.verywellmind.com/narcissistic-abuse-cycle-stages-impact-and-coping-6363187.
