तुम्ही नार्सिसीस्टीक अत्याचाराचे बळी आहात का ?

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल. मी काही कुणी licensed therapist किंवा मानसोपचारतज्ञ नाही पण माझ्या वाचण्यातून , ऐकण्यातून मी जे काही शिकले आणि मी स्वतः ज्या परिस्थितिमधून बाहेर पडले त्यावरून मी खाली काही मुद्दे मांडत आहे.

तर तुम्ही नार्सिसीस्टीक अत्याचाराचे बळी असण्याची काही महत्त्वाची लक्षणं अशी – 

१.Walking on eggshells

तुम्ही अति सतर्क बनले आहात आणि तुमच्या प्रत्येक कृतीवर दुसऱ्या व्यक्तीची काय प्रतिक्रिया असेल याचा सतत विचार करता.अनेकदा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी उगीच वाद नको म्हणून तुम्ही करत नाही. याला नार्सिसीस्टीक भाषेत म्हणतात “walking on eggshells”

२.Isolation 

तुम्ही सगळ्या लोकांपासून वेगळे आणि एकटे झाला आहात. तुम्ही लोकांमध्ये मिसळणे टाळत आहात. 

३. Declining 

तुम्ही चुकीची वागणूक सहन करत राहता आणि स्वतःला इतर कामांमध्ये किंवा दुसऱ्या उपक्रमांमध्ये इतकं गुंतवून घेता कि ज्या गोष्टीचा आपल्या मनाला त्रास होतो त्या गोष्टीचा विचार करायला वेळच उरत नाही. थोडक्यात तुमच्या  परिस्थितीकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि ती बदलण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही. 

४. Indecisiveness & Need for external Validation

तुम्ही स्वतःचे कोणतेही निर्णय स्वतः घेऊ शकत नाही किंवा तुम्ही कोणताही निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणं टाळता.  तुमच्या प्रत्येक निर्णयाला कोणीतरी दुसऱ्याने मान्यता दिली कि मगच तो निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटू लागतं 

५. Self- Gaslighting / Defending the abusive behavior 

आपल्या जवळची व्यक्ती जेंव्हा आपल्याशी वाईट वागते तेंव्हा तो एक मोठा मानसिक धक्का असतो आणि त्यापेक्षाही काही काळापूर्वी अगदी प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती जेंव्हा अचानक वाईट वागू लागते तेंव्हा ते चुकीचं वागणं मान्य करण्या ऐवजी, तुम्ही ते वागणं कसं फार वाईट नाही आहे हे स्वतःला समजावू लागता आणि एकाप्रकारे त्या वागण्याचं समर्थन करता. 

६. Self doubting 

प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही अति सतर्क असता आणि तुम्ही सतत काहीतरी चुकीचं वागत आहात अशी भीती तुम्हाला मनातून वाटत राहते. 

७.Unexplained ailments or pain

पूर्वी कधीही न झालेले आजार बळावू लागतात किंवा पूर्वी कधीही न जाणवलेली शारीरिक दुखणी अचानक जाणवू लागतात. आणि या गोष्टी होण्यासाठीचं कुठलंही ठोस कारण तुम्हाला समजत नाही. तुम्ही अचानक अतिविचारी बनू शकता किंवा तुम्हाला insomnia म्हणजेच निद्रानाशाचा त्रास होऊ लागतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुम्ही खूप चिडचिडे होता. 

८. Confusion and Depression

अनेक वर्ष चालू असलेलं मानसिक छळच चक्रव्यूह तुम्हाला पूर्णपणे गोंधळून टाकतं. काय चूक आणि काय बरोबर हे समजून घेण्याची कुवत कमी होत जाते. self doubting मुळे  तुम्ही सतत गोंधळलेले असता. बाकी नार्सिसिस्ट सकट आजूबाजूचे सगळे लोक छान मजेत असतात आणि त्यामुळे आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे हि भावना  अजूनच गोंधळून टाकते. हळू हळू तुम्ही निराश होऊ लागता 

तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील किंवा माझ्याशी एकट्याने बोलावसं वाटत असेल तर मला नक्की मेसेज करा.

 तुम्हाला हि माहिती उपयोगी वाटते का? वाटत असेल तर प्लिज माझ्या ब्लॉग ला सबस्क्राइब  करा आणि इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा . तुमच्या काही प्रतिक्रया असतील तर मला इमेल करून नक्की सांगा. 

← Back

Thank you for your response. ✨

Warning
Warning
Warning
Warning.

Leave a comment