नार्सिसिस्टिक अत्याचार हा अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी सतत होत असतो. त्या पद्धती इतक्या बेमालूम किंवा subtle असतात कि जर कोणी बाहेरूच्या माणसाने ते ऐकलं तर त्याला त्या मध्ये काही गैर वाटणारच नाही. तुम्ही गूगल सर्च केलं किंवा यूट्यूब वर व्हिडिओज बघितले तर यातील अनेक संज्ञा वारंवार तुमच्या कानावर पडतील. त्यामुळे त्यांचा अर्थ समजून घेतला तर ते सर्च रिझल्ट्स किंवा व्हिडीओज समजणं तुम्हाला सोपं जाईल.
या प्रत्येक संज्ञेबद्दल मी वेगळी पोस्ट लिहीनच पण त्याआधी त्या संज्ञा मी खाली नमूद केल्या आहेत.
गॅसलाईटींग म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला आणि भावनेला नाकारणे किंवा त्या गोष्टी किती चुकीच्या आहेत हे सतत बोलून दाखवणे.
Blame Shifting / Crazy Making (ब्लेम शिफ्टिंग)
ब्लेम शिफ्टिंग म्हणजे स्वतः करत असलेल्या गोष्टींचा आरोप पलटवून समोरच्यावर लावणे.
मिररिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या सवयी आणि आवडीनिवडी यांचा अभ्यास करून एकदम तसच वागणे.. यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण त्यांच्या सारखेच आहोत असं वाटतं आणि ते सहजपणे नार्सिसिस्टिक व्यक्तीकडे आकर्षित होतात.
लव्ह बॉम्बिंग म्हणजे प्रेमाचा वर्षाव. एवढं अती प्रेम आणि अति काळजी दाखवणे कि समोरची व्यक्ती हुरळून जावी आणि पुढे होणाऱ्या अत्याचाराला तिने विरोध करू नये.
जेंव्हा नार्सिसिस्टिक अत्याचाराचे व्हिक्टीम त्या नात्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना पुन्हा त्या नात्यात आणि स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करते. या प्रकाराना हुव्हरिंग असे म्हणतात
Passive – Aggressiveness ( पॅसिव्ह अग्रेसिव्हनेस )
पॅसिव्ह ॲग्रेसिव्हनेस म्हणजे सरळ सरळ आपला राग किंवा नकारात्मक भावना व्यक्त करण्याच्या ऐवजी इनडायरेक्टली विचित्र वागण्यातून किंवा कधी चांगलं कधी वाईट वागून त्या भावना व्यक्त करणे. , नार्सिसिस्टिक व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे विक्टिम्स गोंधळून जातात
Triangulation (ट्रायान्ग्यूलेशन )
ट्रायान्ग्यूलेशन म्हणजे जेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्ती त्यांच्या व्हिक्टिमच्या विरोधात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगतात आणि त्यामुळे ती व्यक्ती नार्सिसिस्टिक व्यक्तीच्या वागण्याचं समर्थन करू लागते आणि व्हिक्टिम्स अजुनच एकटे पडतात. हि तिसरी व्यक्ती बरेचदा मुलं असतात जी एका पालकाच्या चुकीच्या शिकवणुकीमुळे चांगल्या पालकाच्या विरुद्ध बोलू लागतात.
Smear Campaign ( स्मिअर कॅम्पेन)
जेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्तींना आपला नात्यातला कंट्रोल कमी होऊ लागला आहे असं वाटतं किंवा जेंव्हा नातं तुटतं तेंव्हा ते दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी आणि बदला घेण्याच्या भावनेने त्यांच्या विरुद्ध चुकीचे गैरसमज पसरवतात. या वागण्याला smear campaign असं म्हणतात.
Flying Monkeys ( फ्लायिंग मंकीज)
फ्लाईंग मंकीज म्हणजे अशी लोकं जी नर्सेसिस्टिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावाचं समर्थन करतात आणि त्यांच्या बाजूने व्हिक्टिम्सची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात
Walking on Eggshells (वॉकिंग ऑन एग शेल्स )
नार्सिसिस्टिक नात्यात राहणारे व्हिक्टिम्स हे सतत गोंधळलेले असतात प्रत्येक गोष्ट करताना त्यांना नासिक व्यक्तीची काय प्रतिक्रिया असेल याची भीती वाटत असते त्यामुळे ते सतत सतर्क असतात आणि मोकळेपणाने जगू शकत नाहीत यालाच म्हणतात वॉकिंग ऑन एग शेल्स
कोडिपेंडन्सी म्हणजे जेंव्हा नात्यामधली एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती वर प्रत्येक निर्णयासाठी पूर्णपणे अवलंबून असते. त्यांचं अस्तित्व फक्त दुसऱ्या व्यक्तीची काळजी घेणं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण करणं यासाठीच आहे असं त्यांना वाटत असतं.
Trauma Bonding ( ट्रॉमा बॉन्डिंग )
ट्रॉमा बॉन्डिंग म्हणजे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची इतकी सवय होणे कि त्या दबलेल्या आयुष्याशिवाय आपलं काही वेगळं आयुष्य असू शकत असच त्यांना वाटत नाही. त्यामुळे कितीही त्रास होत असला तरी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा ते विचारही करू शकत नाहीत.
Confusion & Frustration ( कन्फ्युजन आणि फ्रस्ट्रेशन )
नार्सिसिस्टिक नात्यातल्या सतत घडणाऱ्या गोष्टींमुळे या नात्याचे बळी बनलेले लोक सतत गोंधळलेले आणि वैतागलेले असतात. त्यांना आपल्या बाबतीत काय होतंय तेच कळेनासं होतं. एखादी व्यक्ती जी आपल्याशी कधी अतिशय प्रेमाने वागते ती अचानक इतकी वाईट का वागते हेच त्यांना कळत नसतं आणि त्यामुळे त्यांच्या मनात त्यांच्या स्वतःच्या भावनांबद्दलच गोंधळ आणि निराशा असते.
Narcissistic F.O.G (Fear , Obligation , Guilt) ( भीती , बंधन , अपराधी भावना)
नार्सिसिस्टिक नात्यात अडकलेले लोक त्या नात्यात वर्षानुवर्षे का राहतात याची तीन मुख्य कारणं म्हणजे
१. भीती (आपण या नात्यातून बाहेर पडलो तर आपला निभाव कसा लागेल ? ) २. बंधन ( नात्याला जपणं आणि सगळं ठीक करणं हि आपली जबाबदारी आहे असं वाटणं ) ३. अपराधी भावना (नातं तोडण्याची किंवा त्या नात्याला जपण्याचा प्रयत्न न केल्याची अपराधी भावना)
Indecisiveness (इनडिसिसिव्हनेस)
इनडिसिसिव्हनेस म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता नसणे. नार्सीसिस्टिक नात्यात असणाऱ्या व्यक्ती सतत इतक्या दबलेल्या असतात आणि त्यांना सतत इतकं मॅनिप्युलेट केलं गेलेलं असतं कि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. जितके जास्त वर्ष हे लोक नार्सीसिस्टिक नात्यात राहतात तेवढी हि क्षमता अधिक अधिक कमी होत जाते.
Gray Rocking ( ग्रे रॉकिंग)
ग्रे रॉक म्हणजे अगदी एक अगदी निर्जीव दगड. ग्रे रॉकिंग हि नार्सिसिस्टिक अब्युझशी लढण्याची एक पद्धत आहे. जर व्हिक्टिम्स अगदी निर्जीव दगडासारखे वागू लागले तर नार्सिसिस्टिक व्यक्तींच्या कुठल्याही मॅनिप्युलेशन टेक्निकचा परिणाम त्यांच्यावर होत नाही असं नार्सिसिस्टिक व्यक्तींना वाटू लागतं त्यामुळे त्यांचा व्हिक्टिम्स मधला इंटरेस्ट कमी होतो आणि त्या बरोबर व्हिक्टिम्स ना होणार त्रास देखील कमी होतो.
