जेंव्हा नार्सिसिस्टिक अत्याचाराचे व्हिक्टीम त्या नात्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात किंवा नात्यातून बाहेर पडतात तेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना पुन्हा त्या नात्यात आणि स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करते. या प्रकाराला हुव्हरिंग असे म्हणतात.
नार्सिसिस्टिक लोक हुव्हर का करतात?
नार्सिसिस्टिक नात्यात काही काळानंतर व्हिक्टिम्सना नार्सिसिस्टिक दुष्टचक्राची जाणीव होऊ लागते आणि कुठेतरी आपण या दलदलीमध्ये अडकत चाललो आहे याची देखील जाणीव होऊ लागते त्यावेळी हे व्हिक्टिम्स नार्सेसिस्टिक व्यक्तीपासून दूर जाऊ लागतात किंवा स्वतःच्या लक्ष्मण रेखा जास्त प्रकर्षाने आखू लागतात अर्थातच त्यामुळे नार्सिसिस्टिक व्यक्तीला आपला नात्यातला कंट्रोल कमी झाला असं वाटू लागतं आणि ते हूव्हरिंग सुरु करतात.
तुमच्या नात्यातखालील काही गोष्टी होत आहेत का? खालील लक्षणे नक्की तपासून पहा
१. लव्ह बॉम्बिंग
ज्याप्रमाणे नार्सिसिस्टिक व्यक्ती नात्याच्या सुरुवातीला लव्ह बॉम्बिंग करते त्याचप्रमाणे जेव्हा त्यांचे विक्टिम त्यांच्यापासून दूर जाऊ लागले आहेत असं त्यांना वाटू लागतं तेव्हाही ते स्वतःचा चार्मिंग आणि प्रेमळ स्वभाव परत आणतात. लव्ह बॉम्बिंगबद्दल अधिक माहिती या लिंक वर वाचा
२. खोटे आरोप करणे
नार्सिसिस्टिक व्यक्ती व्हिक्टिम्सना चिडवण्यासाठी उगीचच खोटे आरोप करते किंवा वाद उकरून काढते त्यामुळे जरी इच्छा नसेल तरीही व्हिक्टिम्सना त्यांच्याशी काही ना काही तरी बोलावत लागतं आणि ते चक्रात परत अडकतात
३. स्वतःला इजा पोहोचवू अशी धमकी देणे
व्हिक्टिम्सना अपराधी वाटावं म्हणून नार्सिसिस्टिक व्यक्ती खोटे खोटे अश्रू काढणे , स्वतः किती त्रासात आहे हे दाखवण्यासाठी स्वतःला काहीतरी इजा करून घेतो आहे असं भासवणे इत्यादी प्रकारही करतात.
४. माफी मागणे आणि आपण असे पुन्हा वागणार नाही असं वचन देणे
जर व्हिक्टिम्स अजूनही नार्सिसिस्टिक नात्यात राहत असतील तर त्यांच्या समोर खोटी माफी मागणे आणि आपण पुन्हा असा कधीच करणार नाही असं खोटं वचन देणे .
५. एनेबलर्सचा वापर करणे
एनबलर्स म्हणजे त्या व्यक्ती ज्या नार्सिसिस्टिक वागण्याचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समर्थन करतात. ते देखील काही प्रमाणात अत्याचारांमध्ये भर घालत असतात. नार्सिसिस्टिक व्यक्ती अशा एनबलर्स चा वापर करून व्हिक्टिम्सना पुन्हा आपल्या कंट्रोल खाली आणू पहातात.
नार्सिसिस्टिक हूव्हरिंग पासून स्वतःला कसं वाचवाल ?
नार्सिसिस्टिक हूव्हरिंग पासून स्वतःला वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यांच्या हूव्हरिंग करण्याच्या पद्धतींवर लक्ष देणे आणि त्यांच्या वागण्याला बळी न पडणे.
- जर ते तुमच्याशी जवळीक साधण्यासाठी दुसऱ्यांचा वापर करत असतील तर त्यांच्या या एनबलर्स कडे दुर्लक्ष करा आणि त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका.
- जर नार्सिसिस्टिक व्यक्ती स्वतःला दुखापत करून घेण्याची धमकी देत असेल तर पोलीस किंवा इमर्जन्सी ला फोन करून त्यांची मदत घ्या.
- आणि आधी लिहिल्याप्रमाणे नार्सिसिझम च्या बाबतीत एखाद्या एक्स्पर्ट थेरपिस्ट किंवा काऊन्सेलर चा सल्ला नक्की घ्या.
तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत असं कधी झालय किंवा होतंय का ? तुमच त्या बाबतीत काय म्हणणं आहे? मला ई-मेल करून नक्की सांगा.

One Comment Add yours