मिररिंग ही नार्सिसिस्टिक लोकांची लव्ह बॉम्बिंग करण्याची एक पद्धत आहे.
एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर मिररिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आरसा बनणे, जेणेकरून त्या व्यक्तीला आपलंच प्रतिबिंब समोर दिसतंय असं वाटतं.यामुळे नार्सिसिस्टिक व्यक्ती अगदी आपल्यासारखीच आहे असं व्हिक्टिम्स ना वाटू लागतं आणि ते सहजपणे नार्सिसिस्टिक व्यक्तीकडे आकर्षित होतात.
नार्सिसिस्टिक व्यक्ती आपल्या व्हिक्टिम्सवर सतत नजर ठेवून असते म्हणजे व्हिक्टिम्सच्या आवडीनिवडी,क्षमता आणि कमतरता या सगळ्या त्यांना बारकाईने माहिती असतात. मिररिंग करताना ते या सगळ्या माहिती चा वापर करून स्वतः व्हिक्टिम्सच्या मनाप्रमाणे वागल्यासारख भासवतात. त्यामुळे साहजिकच व्हिक्टीम ना त्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे असं वाटू लागतं.
नार्सिसिस्टिक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्हिक्टिम्सना आपल्या ताब्यात ठेवायचं असतं त्यामुळे, नार्सिसिस्टिक चक्रव्यूहातल्या लव्ह बॉम्बिंग फेज मध्ये तर मिररिंगचा वापर सर्वात जास्त होतो.
असं करून नार्सिसिस्टिक व्यक्तीला काय मिळत?
स्वतः च्या अवगुणांना लपवून दुसऱ्याचे गुण कॉपी केल्याने नार्सिसिस्टिक व्यक्तीला एक विचित्र sense of identity मिळते. त्याबरोबर व्हिक्टीम बरोबर कनेक्शन तयार झाल्यामुळे त्यांचा नार्सिसिस्टिक व्यक्ती वर विश्वास वाढतो.जवळीक वाढते.
मिररिंग होतंय हे कसं ओळखावं?
प्रत्येक नार्सिसिस्टिक व्यक्तीची मिररिंग ची पद्धत वेगळी असू शकते पण खालील काही मिररिंग ची प्रमुख लक्षणं आहेत.
- लव्ह बॉम्बिंग
- व्हिक्टिम्स बद्दल खाजगी माहिती जाणून घेण्याचा अट्टाहास
- दुसऱ्या व्यक्ती नि कितीही मर्यादा आखल्या असल्या तरी त्यांचं पालन न करणे
मिररिंग होतंय? मग काय करावं ?
लवकरात लवकर मिरारींग होतंय हे ओळखून त्या वागण्याला हुरळून न जाता त्या कडे दुर्लक्ष करणे हा सगळ्यात सरळ उपाय आहे.
पण तो अमलात आणण तेवढं सोप्प नसतं कारण एक चांगल्या अर्थाने केलेलं मिररिंग आणि एका नार्सिसिस्टिक व्यक्तीने केलेलं मिररिंग यात व्हिक्टिम्स गोंधळून जातात.
हेल्दी मिररिंग हे दोन व्यक्ती मधलं कनेक्शन खरंच वाढवतं पण त्यात कोणताही स्वार्थ नसतो. फक्त मनापासून एखाद्या व्यक्तीशी जोडण्याची इच्छा असते आणि त्यातून काही कमावण्याचा हेतू अजिबात नसतो.
तेंव्हा तुमच्या नात्यात मिररिंग होतंय का ? ते हेल्दी आहे कि मॅनिप्युलेटिव्ह आहे ते तपासून पहा आणि स्वतःला मानसिक अत्याचाराच्या चक्रव्यूहात अडकण्यापासून वाचावा.
तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली? तुमच त्या बाबतीत काय म्हणणं आहे? मला ई-मेल करून नक्की सांगा.
