विचार करा .. तुमच्या वाटेमध्ये फुटलेल्या अंड्याच्या कवचाचे तुकडे पडले आहेत आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी तीच एक वाट आहे.आता तुमच्या पायाला जखम होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? तुम्ही फार हळुवारपणे शक्य तेवढं त्या कवचांना न फोडता त्यावर चालायचा प्रयत्न कराल.
NC व्हिक्टिम्स च्या बाबतीत पण असच काहीसं सतत होत असत. आपण NC व्यक्तीला जर दुखावलं तर त्याचे अतिशय वाईट परिणाम होतील अशी भीती वाटत असते. आपल्या नात्यात , घरात शांतता रहावी म्हणून व्हिक्टिम्स सतत अतिशय काळजीपूर्वक वागत राहतात. चुकूनही अशी कुठली घातक गोष्ट आपल्याकडून बोलली किंवा केली जाऊ नये या तणावाखाली हे व्हिक्टिम्स असतात.
“तू खूपच सेन्सिटिव्ह आहेस”
“एवढी छोटीशी गोष्ट पण तुला नीट करता येत नाही ना ?”
“तू खरंच हे कपडे घालून बाहेर येणार आहेस? कसं दिसतंय ते”
अशा काही अगदी subtle पण बोचणाऱ्या मस्करी वजा टोमण्यातून NC व्यक्ती सतत आपल्या व्हिक्टिम्स ना judge करत असते. वरवर कितीही दुर्लक्ष केलं तरी कालांतराने व्हिक्टिम्स च्या मनात एक तर सेल्फ-डाउट निर्माण होतो किंवा ते NC व्यक्तींच्या टोमण्यांपासून वाचण्यासाठी प्रत्येक गोष्ट १० वेळा विचार करून करायला लागतात. NC व्यक्तीची so -called मस्करी ऐकण्यापेक्षा त्यांना ती मस्करी करण्याचं कारणच मिळणार नाही यासाठी ते झटत राहतात. या त्यांच्या वागण्यालाच walking on eggshells अस म्हणतात.
बहुतेक वेळा त्यांचं हे वागणं अगदी त्यांच्याही नकळत होत असतं. ते स्वतःच त्या असुरक्षित, गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या परिस्थितीत जात आहेत हेच त्यांना कळत नसतं. अनेक वर्ष जेंव्हा मनाविरुद्ध जगणं हे असच चालू रहातं तेंव्हा त्या व्हिक्टिम्स ना मग मानसिक किंवा शारीरिक आजार होऊ लागतात.
Are you walking on eggshells ? खालील उदाहरणं तपासून पहा
- तुम्ही NC व्यक्ती समोर किंवा कोणाहीसमोर तुमची मतं मोकळेपणाने मांडू शकत नाही
- आपण काहीतरी बोलू किंवा वागू आणि त्यामुळे NC व्यक्ती चिडेल अशी एक भीती सतत तुमच्या मनात असते.
- जरी तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तरीही जर NC व्यक्ती ती आवडत नसेल तर काहीतरी कारण काढून तुम्ही ती गोष्ट करण टाळता.
- NC व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही आवाज करत नाही. त्यांच्या आजूबाजूला नेहमी गप्प रहाता.
- NC व्यक्ती ला न आवडणाऱ्या सगळ्या व्यक्तींशी तुम्ही नातं तोडून टाकता.
- NC व्यक्तीची चाहूल लागली किंवा त्यांचा फोन आला तर तुम्ही लगेच खूप अलर्ट होता किंवा तुमचे heartbeats वाढायला लागतात.
- फक्त NC व्यक्ती ला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही जेवणांत बनवता आणि पदार्थपण त्यांच्या आवडीच्या पद्धतीनेच बनवता
- घरातच नाही तर बाहेर देखील स्वतःच मत ठामपणे मांडायला तुम्हाला भीती वाटू लागते.
Walking on eggshells चे व्हिक्टिम्स वर होणारे परिणाम
- सतत चिंताग्रस्त असणे.
- सतत च्या मस्करी आणि टोमण्यांना ऐकून Self-Esteem कमी असणे.
- बाहेरच्या सगळ्या जगापासून एकटे पडणे आणि त्यात मिसळण्याची भीती वाटणे.
- स्वतःची चूक असो व नसो , सतत दुसऱ्यांची माफी मागत राहणे.
- जणू काही NC व्यक्तीच तुमच्या मनातून बोलत आहे अशाप्रकारे स्वतः च स्वतःला मनातून नावं ठेवणे.
स्वतःला कसं वाचवाल ?
- शक्य असेल तर अशा नात्यातून लवकरात लवकर स्वतःला बाहेर काढा.
- जर बाहेर पडणं सहजासहजी शक्य नसेल तर ग्रे रॉकींग हि एक स्वतःला सावरण्याची परिणामकारक पद्धत आहे.ग्रे रॉकींग म्हणजे NC व्यक्तीसमोर एका अतिशय कंटाळवाण्या निर्जीव राखाडी दगडाप्रमाणे वागणं . NC व्यक्तीच्या कोणत्याही बोलण्याबद्दल indifferent राहणं आणि त्याचा स्वतःवर अजिबात परिणाम करून घेऊ नये. एखाद्या निर्जीव दगडाप्रमाणे त्यांना कुठल्याही बाबतीत प्रत्युत्तर न देणं आणि जेवढ्यास तेवढा संभाषण करणं
- मेडिटेशन करा जेणेकरून तुमचं मन शांत होईल.
- आनंदी आणि सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा.
- जर NC नात्यामुळे तुमची काही जुनी नाती दुरावली असतील तर त्या नात्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करा.
- स्वतःवर प्रेम करा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. स्वतःला pamper करा.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कि तुमची किंमत फक्त तुम्ही करू शकता.. जगातल्या इतर कुठल्याही व्यक्तीला तुमची किंमत करण्याची परवानगी देऊ नका.
हि माझी walking on eggshells बद्दलची पोस्ट तुम्हाला हेल्पफुल होईल किंवा झाली असेल अशी अपेक्षा करते.तुमच्या फीडबॅक ची मी वाट पहाते आहे.

One Comment Add yours