
Healing from emotional abuse
नमस्कार मी काव्या कुलकर्णी ! मी गेली १९ वर्ष अमेरिकेत राहते आहे. उच्चशिक्षित आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या बळावर अगदी सुखात घालवू शकते इतकं कमावते. पण तरीही आयुष्याची जवळ जवळ २ दशकं मी एका अशा नात्यात घालवली जे नातं चुकीचं आहे अशी माझी Gut Feeling मला लग्न झालेल्या दिवसापासून सांगत होती पण मला इतक्या वेगवेगळ्या गोष्टींची भीती होती की मी कधी स्वतःसाठी ठामपणे उभं राहण्याची हिंमत केली नाही. या उलट मी स्वतःला कायम समजावत राहिले कि मीच ऍडजेस्ट केलं पाहिजे. आपलेच दात आणि आपलेच ओठ कशाला उगीच लोकांसमोर आपल्या बिघडलेल्या नात्याचा बोभाटा करायचा .. वगैरे वगैरे
शिवाय स्वतः वर एक वेडा विश्वास पण होता कि आपल्या प्रेमाने आपण सगळं बदलू शकतो. आपणच जर आपल्या नात्याला बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर कोण करणार ? आपण चांगलं वागत राहायचं आणि एक ना एक दिवस त्याला माझी किंमत नक्की कळेल.
तीच होती माझी सगळ्यात मोठी चूक आणि माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सच मूळ पण तेच होतं. कितीही वाईट वाटत असलं तरी प्रत्येकवेळी हा माझा स्वभाव पुन्हा पुन्हा मला त्याच चक्रात अडकवत होता. १८ वर्षांनी जेव्हा खऱ्या अर्थाने मी मान्य केल कि मी एका हेल्दी रिलेशनशिप मध्ये नाही आहे तेंव्हा माझ्या आयुष्यातल्या खऱ्या बदलाला सुरुवात झाली.
मला सतत असच वाटायचं को चार भिंतीच्या मागे जो मानसिक तणाव किंवा bullying मी सहन करत होते ते कुणाला मी कधीच सांगू शकणार नाही rather त्यांना ते समजणार नाही. त्यामुळे मी कायम कुढतचं राहिले. Am I going crazy? या माझ्या google search वरून narcissism आणि narcissistic personality म्हणजे काय हे कळलं. मला जाणवलं कि मी एकटी नाही आहे. या जगात असे अनेक लोक आहेत जे या परिस्थितीतून गेले आहेत आणि त्यांनी त्या नात्याच्या पलीकडे जाऊन स्वतःच आयुष्य सुंदर बनवलय.मग मी जास्तीत जास्त त्या विषयाबद्दल माहिती जमवू लागले. कारण मला मनापासून माझी परिस्थिती बदलायची होती.
खूप गूगल सर्च , यू ट्यूब व्हिडीओज आणि पॉडकास्टस ऐकले; पण तरीही मला हवं होतं कुणीतरी भारतीय! मराठी नसेल तर निदान हिंदी बोलणारं तरी; ज्याला माझी बॅग्राऊंड माहित असेल; माझ्या भारतीय कुटुंब संस्थेची ज्या व्यक्ती ला माहित असेल अशी व्यक्ती मी शोधत होते. पण मला नार्सिसिसीजम या विषयावरचे कोणतेही हिंदी, मराठी आर्टिकल्स किंवा पॉडकास्ट सापडले नाहीत.
शेवटी जे इंग्लिश मध्ये मिळालं त्यावरूनच मी या विषयाबद्दल शिकले. साधारण १ वर्षांपूर्वी नार्सिसिसीजम असं काही असतं हे ही मला माहित नव्हतं पण आता इतकी माहिती नक्कीच आहे कि कुणा दुसऱ्याला माझ्या भाषेतून मी त्या बद्दल सांगू शकते.
मला जे कळायला इतकी वर्ष लागली ते कुठल्यातरी दुसऱ्या काव्याला तरी वेळेत समजावं आणि तिने तिच्या आयुष्याचा योग्य मार्ग शोधावा म्हणून माझा हा प्रयत्न आहे. @love.lagna.locha हे इंस्टाग्राम हॅन्डल मी नुकतंच सुरु केलय. त्या वरील पोस्टबद्दल ची अवांतर माहिती मी इथे या ब्लॉग मधून लिहिणार आहे. तेंव्हा please माझ्या Instagram handle ला follow karaआणि या ब्लॉग ला subscribe करा. जेणे करून मी लिहिलेल्या नवीन पोस्ट ची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल.
