

आयुष्याची तरुणाईची १९ वर्ष मी एका अशा नात्यात घालवली ज्या नात्यात मी इतकी वर्ष का राहिले हे माझं मलाही कळलं नाही. माझे भारतीय आणि मराठी संस्कार मला नेहमी हेच सांगत राहिले कि नवरा कसाही असला तरी त्याच्याशी जमवून घ्यायलाच हवं. पुरुष चिडके, हट्टी असतातच . आपणच जमवून घ्यायचं असतं.
पण एक वेळ अशी आली कि माझे डोळे खाडकन उघडले. माझ्या लक्षात आलं कि असं करून मी माझच नाही तर माझ्या मुलाचं आयुष्य पण खराब करत आहे. त्याच्यावर मी चुकीचे संस्कार करत आहे. कदाचित अशा वातावरणात तो अजून राहिला तर तो सुद्धा त्याच्या वडिलांसारखाच बनेल. माझ्यातल्या आईच्या त्या भीतीने मला माझी उत्तरं शोधण्याची ताकद मिळाली आणि मी माझ्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायचं ठरवलं.
माझा हा चुकीच्या नात्यात अडकण्यापासून ते स्वतःसाठी ठामपणे उभं राहण्याचा प्रवास इथे तुमच्याशी शेअर करत आहे.
