नार्सिसिझम आणि मानसिक अत्याचार

आपल्याकडे आज २०२३ मध्ये सुद्धा अत्याचार किंवा अब्युझ म्हटलं कि फ़क्त शारीरक अत्याचार एवढंच समजलं जातं. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृती मध्ये तर अत्याचार करणारे पुरुषच असतात आणि ते बळाचा वापर करून इतरांना त्रास देतात असच बहुतांशी लोकांना वाटतं. पण या शारीरिक अत्याचारापेक्षा अनेक पटीने घातक पण सहसा ज्या बद्दल बोललंच जात नाही असा विषय म्हणजे मानसिक अत्याचार.

या विषयावर फारशी माहिती देखील उपलब्ध नाही आहे. याची दोन मुख्य कारणं अशी
१. आपल्याकडे या विषयावर फारशी जागरूकता नाही आणि प्रमुख प्रसार माध्यमं किंवा शिक्षण संस्था या बाबत कधीच काही प्रसारित करत नाहीत.
२. जरी असे प्रकार त्यांच्या बाबतीत होत असले तरी व्हिक्टिम्स घाबरून, लोक काय म्हणतील , त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही असं म्हणत त्या बद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत.

मानसिक अत्याचाराचा एक प्रकार म्हणजे Narcissistic Abuse. गेल्या काही वर्षात खूपच प्रकाशात आलेला नार्सिसिझम हा मानसिक आजार. पाश्चिमात्य देशांमध्ये या विषयावर खूप लिहिलं , बोललं जातय. अगदी मुख्य प्रसार माध्यमं आणि social media वर या बाबतीत भरभरून माहिती मिळते आहे.


पण माझ्या मते भारतीय लोकांमध्ये आजही त्या बद्दल माहिती नाही.इथे अमेरिकेतही माझ्या मराठी मैत्रिणींना किंवा भारतीय लोकांना जेंव्हा मी माझ्या घटस्फोटाचं कारण Narcissistic Abuse असं सांगते तेंव्हा त्यांना कळतच नाही मी काय म्हणतीये.
अगदी काही जणांना मी समजावयाचा प्रयत्न केलाच तर मला उलटा प्रश्न येतो “अगं, पण हे सतत मस्करी, चीडचीड हे सगळेच नवरे करतात पण त्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतलास?” मग शेवटी असं होतं कि हे उलटं ऐकून घेण्यापेक्षा कोणालाही काहीही न बोललेलंच बरं.

माझ्या बाबतीत तर गेले अनेक वर्ष हेच होत आलंय. मी कुणाशी काही बोलू शकले नाही आणि बोलले तर मीच वेडी ठरले. शेवटी ज्या क्षणी मी कोणाचाही विचार न करता माझी मी उत्तरं शोधू लागले तेंव्हा मला या विषयाचा खरा उलगडा झाला.

तर मी जे नार्सिसिझम बद्दल स्वतःला शिकवलं ते तुम्हाला या ब्लॉग च्या माध्यमातून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर मला मेल करून नक्की सांगा.

← Back

Thank you for your response. ✨

Warning
तुम्हाला माझी हि वेबसाइट कशी वाटली ?(required)

Warning
Warning
Warning.