Opposites attract.. ही अगदी कॉमनली बोलली जाणारी फ्रेज आहे. नार्सिसिस्टिक नात्यात अगदी तेच होतं. एक अगदी एम्पथेटीक , अजिबात बाउंड्रीज नसणारी , प्रेमळ व्यक्ती त्यांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या कंट्रोलींग , मॅनिप्युलेटिव्ह आणि पॉवर फोकस्ड (नार्सिसिस्टिक) व्यक्ती कडे आकर्षित होतात. अर्थात जेंव्हा एखादी NC व्यक्ती नवीन नात्याला सुरुवात करु पाहत असते तेंव्हा ते अशा एम्पथेटीक,प्रेमळ व्यक्तींना बरोबर हेरतात आणि त्यांच्या मूळ स्वभावापेक्षा अगदी विरुद्ध चेहरा दाखवतात. त्यामुळे त्या एम्पाथेटीक व्यक्ती अगदी सहज NC व्यक्तीच्या जवळ जातात आणि हळू हळू त्या NC व्यक्ती वर डोळे झाकून विश्वास ठेवू लागतात. आणि तिथेच त्यांच्या “codependency ” ची सुरुवात होते.
तर codependency म्हणजे काय?
Codependency हे एक behavioral dysfunction म्हणजे वागणुकीतील दोष आहे. एखादी कोडिपेन्डन्ट व्यक्ती कोणतेही निर्णय स्वतःहून घेऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट करताना या लोकांना दुसऱ्या व्यक्ती कडून validation ची गरज वाटते. त्यामुळे या वागणुकीला “relationship addiction” असही म्हणतात. Codependent व्यक्ती मध्ये खूप कमी सेल्फ एस्टीम असतो आणि दुसऱ्या व्यक्ती कडून validation मिळाल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. कधी कधी जर ते मिळालं नाही तर ते कमीपणाच्या भावनेतुन व्यसनाधीन होतात किंवा डिप्रेशन सारख्या आजारांना बळी पडतात.
Codependent व्यक्ती चे स्वभावविशेष
- प्रेम किंवा काळजी च्या नावाखाली इतर लोकांच्या चुकांना पाठीशी घालण्याची सवय
- नेहमी गरजेपेक्षा जास्त इतरांची सेवा करत राहणे
- इतर लोकानी त्यांच्या सेवेला appreciate केलं नाही तर ते मनाला लावून घेणे.
- नार्सिसिस्टिक किंवा इतर toxic नात्यात वर्षानुवर्षे अन्याय सहन करून सुद्धा नात्याला जोडून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे.
- कुठल्याही गोष्टी ला योग्य समजण्यासाठी दुसऱ्या कुणाच्यातरी approval ची गरज वाटणे.
- स्वतःच मत जर कधी ठामपणे मांडलच तर त्याबद्दल अपराधी वाटणे.
- आपण एकटे पडू किंवा आजूबाजूचे सगळे आपल्याला एकटे पाडतील अशी सतत भीती वाटणे
- स्वतःभोवती मर्यादा घालण्याची किंवा कोणाशी जवळीक साधण्याची भीती वाटणे.
- आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय क्षमतेचा अभाव.
तुम्ही codependent आहात का ? खालील काही गोष्टी तपासून पहा.
- तुम्ही वाद होऊ नये म्हणून नेहमी गप्प राहता
- नेहमी इतरांना तुमच्या बद्दल काय वाटतं याची तुम्हाला भीती वाटते
- तुम्ही इतरांच्या मताला स्वतःच्या मतापेक्षा जास्त महत्त्व देता
- तुमच्या कडून जेंव्हा चूक होते तेंव्हा तुम्हाला फार अपराधी वाटतं
- तुम्हाला कुठल्याही गोष्टी ला “नाही” म्हणणं कठीण होतं आणि नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही आऊट ऑफ द वे जाऊन ती गोष्ट करता.
- तुम्हाला कोणत्याही गोष्टी साठी इतरांकडे मदत मागायला अवघड वाटतं
- तुम्ही एकट्याने कुठलीही गोष्ट करताना गोंधळून जाता
- कितीही गोष्टी साध्य केल्या तरी तुम्हाला काहीतरी कमी वाटतं समाधान मिळत नाही.
- तुम्ही एखाद्या अशा व्यक्ती बरोबर अनेक वर्ष राहिलाय जी सतत तुमची थट्टा मस्करी करत असते किंवा चेष्टेच्या नावाखाली तुम्हाला टोमणे मारत असते (gaslighting)
Codependency वर मात कशी कराल ?
- Self Awareness म्हणजे स्वतःला योग्य प्रकारे अंतर्बाह्य ओळखा. जसे आहात तसेच स्वतःला accept करा.
- जेंव्हा स्वःताला ओळखू लागाल तेंव्हा ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून असाल त्यांच्या पासून जाणीवपूर्वक दूर जा किंवा त्यांना न सांगता छोटे छोटे निर्णय घ्या. यामुळे हळू हळू तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल.
- Always be aware म्हणजे तुमच्या मनात जर codependent विचार येऊ लागले तर त्यांना पटकन ओळखून त्यांना थांबवण्याचा किंवा त्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करा. कालांतराने तुम्हालाच कळेल कि तुमच्या मध्ये खूप जास्त निर्णयक्षमता आहे.
- Stand up for yourself म्हणजे जर कुणी तुमच्याशी चुकीचा वागत किंवा बोलत असेल तर स्वतःला डिफेन्ड करा. उगीच वाद नको म्हणून प्रत्येकवेळी गप्प बसू नका.
- Don’t be afraid to say No म्हणजे “नाही”म्हणायला शिका. जी गोष्ट करणं कठीण असेल त्या साठी नाही म्हणण्यात कोणतीही चूक नाही हे लक्षात घ्या
- Consider therapy एखाद्या तज्ज्ञ व्यक्ती च्या मदतीने तुम्ही codependent कशामुळे झालात याचा अंदाज घ्या आणि त्या मानसिक जखमेवर उपचार करा.
माणसाचं मन हे खूप शक्तिशाली असतं. ज्या मनातील अतिविचारांनी आपल्याला खूप त्रास होतो त्याच मनाला जर आपण सखोल समजून घेतल तर सगळ्या प्रॉब्लेम्सचा उपाय सुद्धा आपल्याला सापडू शकतो.
मी काही कोणी licensed therapist नाही. जे काही मी इथे लिहिलं आहे ते माझ्या स्वानुभवातून आणि वाचून जे शिकले त्यावरून लिहिलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरंच असे काही प्रॉब्लेम्स असतील तर एखाद्या professional चा सल्ला नक्की घ्या आणि तुम्हाला codependency बद्दलची हि पोस्ट कशी वाटली हे मला नक्की सांगा.

Hello
मी नवीन आहे इथे कृपया मला फॉलो करून सहकार्य करा इथे मराठी माणूस कोणच नाही
LikeLike